⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

भुसावळात सैन्याचा खडा पहारा असलेल्या बॅंकेत दरोड्याच्या प्रयत्न, शहरात खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील लष्करी प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेत चोरट्यांनी पाठीमागील भिंत फोडून स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा परीसर लष्कराच्या (मिल्ट्री) अंतर्गत येतो शिवाय सैन्याचा खडा पहारा या भागात 24 तास असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

शहरातील भुसावळ आयुध निर्माणीच्या पुढे भारतीय सैन्य दलाचे ११८ टीए मिल्ट्री बटालियन स्टेशन आहे. या स्टेशनच्या आतील भागात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. तेथे लष्करातील सैन्य कर्मचाऱ्यांची बँक खाती आहेत. या बँकेत दररोज लाखोंची उलाढाल होत असते शिवाय बँकेत जाण्यापूर्वी लष्करी डेपोतून प्रवेश करावा लागतो.

शिवाय बँकेत जाण्यापूर्वी लष्करी डेपोतून प्रवेश करावा लागतो व तेथे सलग 24 तास जवानांचा खडा पहारा असतो मात्र शनिवार व रविवार लागून आलेल्या सुट्यांमुळे चोरट्यांनी प्लॅन रचला व बँकेच्या बंद पडलेल्या शौचालयाला भगदाड करून बँकेचे स्ट्राँग रूम गाठले तसेच स्ट्राँग रूमचे चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापण्याचा प्रयत्नही झाल्याचे सोमवारी बँक उघडल्यानंतर अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली मात्र सुदैवाने स्ट्राँग रूम न फुटल्याने लाखोंची रक्कम सुरक्षित राहिली. शहरात चोर्‍या, घरफोड्या नवीन नाहीत मात्र चोरट्यांनी आता थेट लष्कराच्या ताब्यात असलेल्या परीसरात चोरीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

रोकड सुरक्षित
बँकेच्या लॉकरमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती असून ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. भुसावळातील बँक ऑफ बडोदा शाखेचे चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक भूषण दत्तु येवलकर यांनी भुसावळ शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि 454, 457, 380, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे संशयीतांची चौकशी
लष्कराच्या प्रतिबंधीत परीसरात बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून संशयीतांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली. सलग आलेल्या सुट्यांमध्ये शनिवार व रविवारी तसेच त्यापूर्वी बँक परीसरात नेमके कोण आले व गेले याची माहिती पोलिसांकडून काढली जात असून त्या दृष्टीने संशयीतांची चाचपणीही केली जात आहे शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहितीदेखील काढली जात आहे.

हे देखील वाचा :