---Advertisement---
जळगाव जिल्हा भडगाव

भडगाव तालुक्यात देखील कुकुंबर मोझॅकचा शिरकाव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये केळीवरील कुकुंबर मोझॅक  आजाराने धुमाकूळ घातला आहे. ढगाळ वातावरणात गारवा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कीटक वाढतात. हीच कीटक आता केळीच्या झाडावर देखील बसत असून यामुळे कुकुंबर मोझॅक व्हायरस मोठा प्रमाणावर पसरत आहे. (cucumber mosaic in jalgaon)

banana cmv

संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. भडगाव तालुक्यात देखील हा व्हायरस वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे . याआधी हा व्हायरस केवळ रावेर, मुक्ताईनगर तालुक्यांपर्यंत मर्यादित होता. अशावेळी शेतकऱ्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

याबाबत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, जळगाव जिल्ह्यासाठी हा रोग नवा नाही. यावर योग्य त्या उपाययोजना केल्या तर हा रोग रोखला जाऊ शकतो. रोपांवर येणारा मावा आणि पांढरी माशी यावर त्वरित उपाययोजना केल्यात तर हा रोग पसरणार नाही. याचबरोबर जर शेतातील कोणत्याही झाडावर हा रोग दिसून आला तर त्वरित ते झाड नष्ट केले पाहिजे. जेणेकरून हा रोग पसरणार नाही. याचबरोबर मावा आणि पांढरी माशी यावर लिंबाच्या अर्काचा फवारा केला तर हा रोग पसरणार नाही.



---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---