⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बाप रे.. वन जमीन खरेदीचा झोल, अनेक मोठ्या मंडळीचा हात?

बाप रे.. वन जमीन खरेदीचा झोल, अनेक मोठ्या मंडळीचा हात?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । वन खात्याच्या अखत्यारीत असणार्‍या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्याची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तब्बल साडेआठ कोटी रूपयांचा हा घोटाळा असून यात जळगावातील अनेक मोठ्या मंडळीचा हात असल्याची चर्चा आहे.

संशयित मुकुंद ठाकूर याने वन जमीनीची खोटी कागदपत्रे करून जळगावातील काही जणांना याची विक्री करून पळ काढला आहे. संशयित ठाकूर हा फरार झालेला असून गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात तो यशस्वी ठरला आहे. या प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, हा घोटाळा तब्बल साडेआठ कोटी रूपयांचा असून यात जळगावातील अनेक मोठ्या मंडळीचा हात असल्याची चर्चा आहे. आता यातील सात संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे त्या बड्या मंडळीवर देखील कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.

यांना अटक
दिलीप पंडित सोनवणे, रमेश आनंदा पाटील, रवींद्र विक्रम हटकर, अखंड सीताराम सिंग, सादीक खान शब्बीर खान, महेश रमेश पाटील व पंकज रमेश पाटील या सात जणांना अटक करण्यात आली आहे. आज या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह