जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । एरंडोल तालुक्यात लॉकडाऊन दरम्यान कोणाचेही लक्ष आपल्या कडे नाही. या गैरसमजातून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे बिनदिक्कत आपले काम करीत होते. तसेच तालुक्यात सध्या जोरदार अवैध गौण खनिज वाहतूक करुन चढ्या भावाने विक्री होत आहे.अशा परिस्थितीत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी अचानक अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी मोहीम राबविली.
यावेळी त्यांनी तालुक्यात हनुमंतखेडेसिम येथील गिरणा पात्रात ही मोहीम राबविली.याठिकाणी नेहमी मोठ्याप्रमाणात अवैध वाळू ची चोरटी वाहतूक केली जाते.
यावेळी त्यांच्या सोबत किशोर माळी मंडळ अधिकारी उत्राण,विनायक मानकुम्बरे मंडळ अधिकारी एरंडोल,भरत पारधी तलाठी पथक आदी कर्मचारी उपस्थित होते.