⁠ 
बुधवार, मे 8, 2024

पेसा व नवसंजवनी योजना : अतिदुर्गम आदिवासी भागातील गावाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । पेसा व नवसंजवनी योजनेतील अतिदुर्गम आदिवासी भागातील गाव – खेळ्यांवर आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची संतापजनक बाब समोर आली असून याबाबत लोक संघर्ष मोर्चातर्फे राज्य गाभा समिती व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.

जिल्ह्यातील यावल अभयारण्यातील जामण्या उपकेंद्रात मागील सहा महिन्यांपासून नर्स नसून तेथे जन्मालेल्या मुलांचे लसीकरण सुध्दा मागील दीड महिन्यापासून झाले नव्हते, तसेच गरोदर व स्तंनदा माता यांच्यावर व स्याम व म्याम बालकांवर पूर्ण दुर्लक्ष होत आहे. तसेच रावेर तालुक्यातील निमड्या उपकेंद्रात ही मागील एक वर्षापासून नर्स नाही. चोपडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील देव्हझिरी उपकेंद्रात मागील एक वर्षा पासून नर्स उपलब्ध नाही. तर कर्जाने उपकेंद्रात डॉक्टरांनी मागील तीन महिन्यात ४६ डिलिव्हरी केल्यात पण तिथे कुठलेही साहित्य कॉट वैगेरे उपलब्ध नाहीत. ही सगळी गावे पेसा क्षेत्रात येतात आणि नवसंजवनी योजना ज्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात व आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सचिव असतात ह्या मीटिंग मधे शासनाच्या धोरणानुसार अश्या गावांमध्ये आरोग्य, शिक्षण व रोजगार नियमित पोहवणे ह्याचा विशेष आराखडा घेतला जातो. ‘त्या’ मीटिंग मधेही ह्या सर्व उपकेंद्र जामन्या, निमड्या, देवझिरी ह्या ठिकाणी नर्स देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष आदेश दिलेले असताना व जामण्या येथे नर्स नियुक्त केलेली असताना ही आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या विशेष पाठिंब्यावर त्या आपल्या पूर्वीच्या ठिकाणावरून बदलीच्या ठिकाणी जात नाहीत. हे सर्व अत्यंत खेदजनक असून लोक संघर्ष मोर्चाने ह्या बाबत राज्य गाभा समिती कडे व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांन कडे लेखी तक्रार पाठवली आहे. आरोग्य विभागाच्या ह्या हेडसाळ पणात जर एखादी गर्भवती महिला, बालक यांच्या जीवावर बेतले तर यास जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला असून शासनाने ह्या बाबत वेळीच न्याय करावा अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा दिनू बारेला, ताराचंद पावरा, प्रकाश बारेला, भरत बारेला, इरफान तडवी, रमेश बारेला, पांडू बारेला व प्रतिभा शिंदे यांनी दिला आहे.