⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | बातम्या | पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2022-23 मृग बहार 2 वर्षाकरिता राबविणे बाबत

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2022-23 मृग बहार 2 वर्षाकरिता राबविणे बाबत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना जाहिर आवाहन करण्यात येते की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2022 – 23 या दोन वर्षाकरिता मृग बहाराकरिता लागु करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार मोसंबी, चिकु, पेरु, डाळीब, लिंबू व सिताफळ या फळपिकांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महसुल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना फळपिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेव्दारे मृग बहार फळपिकनिहाय पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता या हवामान घटकाच्या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. सदर योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. मोसंबी व डाळीब) जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

मृग बहार 22-23 विमा संरक्षित रक्कम/ हेक्टर, विमा हप्ता रक्कम/ हे, अंतिम मुदत चिकू – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 60,000, विमा हप्ता रक्कम -7800/- , अंतिम मुदत -30 जुन 2022, डाळींब – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 1,30,000, विमा हप्ता रक्कम -6500/- , अंतिम मुदत – 14 जुलै 2022, पेरु – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 60,000, विमा हप्ता रक्कम -3000/- , अंतिम मुदत -14 जुन 2022, मोसंबी – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 80,000/-, विमा हप्ता रक्कम -4000/- , अंतिम मुदत -30 जुन 2022, लिंबू – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 70,000/- , विमा हप्ता रक्कम -3500/- , अंतिम मुदत -14 जुन 2022, सिताफळ – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 50,000, विमा हप्ता रक्कम -2750/- , अंतिम मुदत – 31 जुलै 2022,

जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता फळपिकांना राबविण्यात येत आहे. तरी विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सव), तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्स्चें टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई 400023, टोल फ्री नंबर -18004195004, ई मेल [email protected] जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्रं. 9595554473

author avatar
टीम जळगाव लाईव्ह