---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

पुतण्यावर अक्षता टाकण्यापूर्वी काकासोबत घडलं विपरीत अन् अख्य गाव झालं सुन्न..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. पुतण्यावर अक्षता टाकण्यापूर्वी काकांसोबत विपरीत घडलंय. पुतण्याचा विवाह असल्याने काका तसेच सर्व कुटुंबिय आनंदात होते. मात्र, रात्री देव नाचवण्याच्या कार्यक्रमात नाचताना नवरदेवाच्या काकांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५, रा. सुरत) असं मयत काकांचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

dinkar mistari adgaon jpg webp webp

याबाबत अधिक असे की, दिनकर मिस्तरी हे आडगाव येथील पुतण्या भूषण मिस्तरी याचा २७ फेब्रुवारी विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते.

---Advertisement---

२६ रोजी सायंकाळी पुतण्या भूषणला हळद लागली. रात्री देव नाचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. यावेळी भूषण याचे काका दिनकर हे अगदी साडी नेसून सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते. मात्र, नाचता नाचता दिनकर मिस्तरी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोहळ्याला उपस्थित नातेवाईकांसह सर्व गाव सुन्न झालं.

विशेष म्हणजे कुटुंबातील इतरांना मानसिक धक्का बसू नये म्हणून दिनकर यांच्या मृत्यूची घटना काही काळासाठी पुतण्या तसेच इतरांकडून लपवून ठेवण्यात आली होती. थोडे बरे वाटत नाही म्हणून त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी आडगावनजीक असलेल्या उंबरखेड या गावानजीक काल सकाळी कानुबाई मातेच्या साक्षीने साध्या पध्दतीने भूषणचा विवाह पार पडला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भूषणचे काका दिनकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---