ना. गुलाबराव पाटील शिवसेनेवर कडाडले.. म्हणाले
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. अशावेळी याबाबत पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, प्रत्येक पक्ष आपल्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कोणाचे नुकसान होईल, कोणाला फायदा होईल हे आज सांगता येत नाही. घोडा मैदान दूर नाही. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका येतीलच आणि त्यावेळी कोणाची ताकद किती आहे हे संपूर्ण जिल्ह्याला दिसेल.
याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यावर ते बोलताना म्हणाले की प्रत्येक पक्षाला आपली पक्ष वाढवण्याची इच्छा असते. त्याप्रमाणे पक्ष आपापल्या निर्णय घेत असतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध पक्ष आपला पक्ष वाढवण्याचे काम करत आहेत. राज ठाकरे आपला पक्ष वाढवत आहेत. जयंत पाटील आपला पक्ष वाढवत आहेत. भाजपही तयारी करते आहे. त्याचप्रमाणे आम्ही देखील आमचा पक्ष वाढवण्याची तयारी करत आहोत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची लोक काम करत आहेत. पण शेवटी घोडा मैदान दूर नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दूध का दूध आणि पानी का पानी तर होणारच.