⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | नागरीकांचा आक्रोश : वरणगावचा वीजपुरवठा तब्बल १० तास खंडित

नागरीकांचा आक्रोश : वरणगावचा वीजपुरवठा तब्बल १० तास खंडित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । आयुध निर्माणी प्रवेशद्वारा समोरील विजेच्या १३२ के.व्ही सबस्टेशनमधील वीजपुरवठा करणारी मुख्य केबल जळाल्याने, वरणगाव शहरातील वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपासुन शुक्रवारी पहाटे ३ वाजेपर्यंत खंडित झाला होता. तब्बल दहा तासांच्या खंडानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तीव्र उकाड्यामुळे रात्रभर नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत होते. तर मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान माहिना सुरू असल्याने तील रोजेदारांना अडचणींना सामोरे जावे लागले.यामुळे नागारीकांकडून आक्रोश प्रगत केला जात आहे.

येथुन जवळच आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारा जवळील १३२केव्हीचे सबस्टेशन मधील वीजपुरवठा करणारी मुख्य केबल अतिरीक्त भारामुळे जळाली. त्यामुळे शहराला विजपुरवठा करणारी यंत्रणा बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी पेट्रोलींग करत शोध घेण्याचे आदेश मुख्यअभियंता तुषार गांजरे यांनी दिले. उच्चदाबाची मुख्य केबल जळाल्याचे समोर आल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांना माहिती दिली. अभियंता तुषार गांजरे, अभियंता डी.आय.पाटील, नीलेश सरोदेंसह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. रात्री ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकेल. या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र पहाटे तीननंतर विजपुरवठा सुरु झाला. मुख्य केबल जळाल्याने तसेच दुसरी केबल उपलब्ध नसल्याने व उपकरणांचा अभाव असल्याने विजपुरवठा सुरळीत करण्यास उशीर झाल्याचे अभियंता तुषार गांजरे यांनी सांगितले.
author avatar
टीम जळगाव लाईव्ह