नदीपात्रात बुडाल्याने पाचोर्‍यातील तरुणाचा मृत्यू

ऑक्टोबर 29, 2022 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । शहरातील रहिवासी असलेल्या तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी घडली. राहुल सुरेश चौधरी (17, श्रीराम नगर, सिंधी कॉलनी, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. राहुल हा भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता मात्र नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्तर करण्यात आली.

in well death

रहाुल हा भाऊबीज सणासाठी गावी आला होता मात्र गुरुवार, 27 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास वालझिरी (ता.चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात आल्यानंतर नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मुलांनी व परीवारातील सदस्यांनी तत्काळ उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित करताच कुटूंबियांनी टाहो फोडला. मयत राहुल चौधरी या तरुणाच्या पश्चात आई, बहिण, मेहुणे असा परीवार आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now