---Advertisement---
गुन्हे जामनेर

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर जंगलात अत्याचार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । जामनेर शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जंगलात लाकूड वेचण्याच्या बहाण्याने तसेच पीडीतेची आई घरात नसताना वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी जामनेर पोलिसात सोमवारी रात्री अत्याचार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime rep jpg webp

नन्हा नजाकत खान (47, जामनेर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 20 जुलै 2022 रोजी 4 वाजेच्या सुमारास नन्हा नजाकत खान याने पीडीत मुलीला लाकूड वेचायला चल, असे सांगून जंगलात तिच्यावर अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची व आईला जंगलात फेकून देण्याची धमकी दिली.

---Advertisement---

यानंतर पीडीतेची आई घरी नसल्याचा फायदा घेत संशयीत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने सोमवारी रात्री तक्रार दिल्याने खान याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (2) (ज) (न) सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---