⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दूध संघ निवडणूक :इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणुक या आठवड्यात जाहीर हाेण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याने राजकीय घडामाेडींनाही वेग देखील आला असून दूध संघाच्या निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्यांकडून पक्षनेत्यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे.


जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत २०२० सालीच संपल्याने सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दूध संघाची निवडणुक प्रक्रिया लवकरच सुरू हाेणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणुक लांबणीवर पडल्याने राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरील प्रमुख निवडणुकांमध्ये अाता जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणुक आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्के उमेदवार नसल्याने भाजपची एेनवेळी काेंडी झाली हाेती. ही बाब यावेळी टाळण्यासाठी भाजपने या निवडणुकीत राजकीय तयारीसाठी आघाडी घेतली आहे. भाजपासह अन्य पक्षातील सहकारी दिग्गज उमेदवारांना साेबत घेण्यासाठी भाजपकडून संपर्क साधले जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी राष्ट्रवादीतून एकनाथ खडसे यांच्यासह काेण पुढाकार घेत आहे.