⁠ 
बुधवार, मे 1, 2024

दुर्लक्ष : जि.प.चे व्यापारी संकुल वापराविना पडून

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | पुष्पलता बेंडाळे चाैकातील जिल्हा परिषदेच्या मालकीचे १८ व्यापारी गाळे वापराविना पडून आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला आहे. अनेक वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर जिल्हा परिषदेने ताब्यात घेतले होते.

जिल्हा परिषदेने शहरातील त्यांच्या मालकीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या १८ गाळ्यांना व्यावसायिकांना भाड्याने दिले हाेते. लाखाे रूपयांचे उत्पन्न देणाऱ्या गाळ्याबाबत वाद निर्माण झाल्याने २००३ पासून न्यायालयीन वाद सुरू हाेते. मागील वर्षी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जिल्हा परिषदेने ही मालमत्ता ताब्यात घेतली अाहे. दरम्यान, जुलै २०२१ पासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे गाळे वापराविना पडून आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्न बुडत असून जिल्हा परिषदेने भाड्यापाेटी तेथील गाळेधारकांकडे थकलेले काेट्यवधी रूपये वसूल केलेले नाहीत.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे दुहेरी नुकसान हाेत असल्याची भूमिका काही माजी जिल्हा परिषद सदस्यांनी मांडली आहे.