⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | तब्बल दाेन वर्षांनंतर यावल येथे भगवान बालाजींचा रथाेत्सव उत्साहात

तब्बल दाेन वर्षांनंतर यावल येथे भगवान बालाजींचा रथाेत्सव उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२० । सुमारे ११० वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा रथोत्सवास शनीवारी उत्साहात पार पडला. महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगत असलेल्या नदीपात्रातून रथोत्सवाला सुरुवात झाली. बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढण्यास सुरवात केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रद्द करण्यात आलेल्या रथोत्सवास, यंदा परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. याच वेळी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त चोपडा रस्त्यावरून बारागाड्या देखील ओढण्यात आल्या. शहरातून रथ मार्गस्थ झाल्यानंतर रविवारी पहाटे रथोत्सवाचा समारेप झाला.


दोन वर्षानंतर शनिवारी सायंकाळी श्री बालाजी महाराजांच्या जयघोषाने यावल शहर दुमदुमले होते. महर्षी व्यास मंदिराजवळील नदीपात्रात ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्री बालाजींच्या रथाची महापुजा करण्यात आली. त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ झाला. व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक किमी नदीपात्रातून श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढत आणला. महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात खंडोबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन केले होते. खंडोबा महाराजांच्या बारागाड्यादेखील चोपडा रोडवरून नदी पात्रापर्यंत ओढण्यात आल्या. त्याचा मान भगत गजानन काशिनाथ बडगुजर यांना मिळाला होता. भाविकांची माेठी गर्दी झाली होती.


रथाचा मार्ग असा… शहरात दाखल झालेला रथ हा चावडी, मेनरोड, बोरावलगेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिर मार्गे देवीच्या मंदिराजवळ आल्यावर पहाटे समारोप झाला. शहरातील अरूंद व चढउताराचे रस्ते, रथाची उंची आणि १२ टन वजन असलेल्या या रथास मोगरी लावणे, त्यास वळवणे ही कामे अत्यंत अवघड असतात. पूर्वीपासूनची नेमलेली मंडळीच ही कामे करतात. रथासोबत असेलेले विशिष्ट पेहरावातील भालदार-चोपदार मंडळी शहरवासीयाचें लक्ष वेधत होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह