जळगाव जिल्हाजळगाव शहर

डोळ्यातील तिरळेपणा आता पूर्णपणे बरा होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत डोळ्यातील तिरळेपणा असलेल्या रूग्णांची ही समस्या कायमची दूर होणार आहे. नेत्रविकारांशी संबंधित रूग्णांकरीता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. २४ ते ३० एप्रिल दरम्यान होणार्‍या शिबिरात पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ञांसह दहा डॉक्टरांची टिम कार्यरत राहणार आहे.


डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जिल्ह्यासह खान्देश, विदर्भातील नेत्रविकार असलेल्या रूग्णांसाठी विशेष शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये तिरळेपणा, मोतीबिंदू, पडद्यांचे विकार, रेटीना या सर्व विकारांची तपासणी आणि उपचार मोफत केले जाणार आहेत. बहुतांश रूग्णांमध्ये तिरळेपणाची समस्या अधिक दिसून आली आहे. जन्मजात, अनुवांशिक, नजर कमी असल्याने तिरळेपणाची समस्या उद्भवते. तसेच मेंदूतील नसांचे विकार, जबर मार लागल्यामुळेही अशा प्रकारचे विकार संभवतात. ही बाब लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाने तिरळेपणा आणि नेत्रविकार असलेल्या रूग्णांसाठी शिबिराची संधी उपलब्ध करून दिली आहे. शिबिरासह डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातही सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत रूग्णांची तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे. मोफत उपचारासाठी रूग्णांनी आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड आणणे आवश्यक आहे.


पुण्यातील प्रख्यात तज्ञांसह दहा डॉक्टरांची टिम
नेत्रविकार असलेल्या रूग्णांसाठी घेण्यात येत असलेल्या शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील प्रख्यात तिरळेपणा आणि लहान मुलांच्या नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रिती पाटील, रेटीना तज्ञ डॉ. अश्‍विनी पाटील, डॉ.नि.तु.पाटील, डॉ.निखील चौधरी, नेत्ररोग तज्ञ डॉ. दिशा गांधी, डॉ. मयुरी निलावाड, निवासी डॉ. कल्पना देशमुख, डॉ. आकाश मालवी, डॉ. अनुजा गाडगीळ, डॉ. शिफा, डॉ. आशुतोष अशी तज्ञांची टिम रूग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहे. तरी ज्यांना डोळ्यातील तिरळेपणा किंवा डोळ्याशी संबंधित इतर विकार असतील त्यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रथम येणार्‍या २० रुग्णांना प्राधान्य दिले जाणार असून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ.कल्पना देशमुख यांच्याशी ९०७५१६५८८८, डॉ.अनुजा गाडगीळ यांच्याशी ९७०२१६४०६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Back to top button