जो पर्यंत असोदा रेल्वे पूल पूर्ण होत नाही तो पर्यन्त…
जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जाेपर्यंत उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू हाेत नाही ताेपर्यंत रस्त्याची देखभाल ठेवावी या अटींवर मनपाने रेल्वेगेट बंद करण्यासाठी ना-हरकत दिली आहे. अश्यावेळी भविष्यात रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने वाहनधारकांसाठी पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करावे.असे मनपाने सांगितले आहे.
आसाेदा रेल्वेगेटवर उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. आसाेदासह ८ गावांना तसेच यावल तालुक्याला जाेडणाऱ्या आसाेदा रेल्वेगेट येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या कामाला वेग आल्याने त्या ठिकाणची वाहतूक बंद करावी लागणार आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासनात पत्रव्यवहार सुरू आहे.
अधिक माहिती अशी कि,आसाेदा रेल्वेगेट बंद करण्यासाठी ना-हरकत कळवली आहे. तत्पूर्वी महापालिकेने काही अटी व शर्तींचा अंतर्भाव केला आहे. यात रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी रेल्वेगेटकडून ममुराबाद पुलाकडे अर्थात प्रजापतनगराकडे जाण्यासाठी रस्त्यांचे डांबरीकरण करून द्यावे. अशी सूचना केली. दाेन दिवसांपूर्वीच महापालिकेने रेल्वे प्रशासनाला केली आहे.