---Advertisement---
भुसावळ

जिल्ह्यात ठाकरे गटात जोरदार इनकमिंग : शिंदेंना धक्का

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील उच्च शिक्षित जितेंद्र भास्कर पाटील या शिक्षक असलेल्या तरुणाने उध्दव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शुक्रवारी शिवसेना संपर्क कार्यालय वरणगाव येथे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

rata roko 1 jpg webp webp

शिवसेनाप्रमुख हिदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याने प्रेरीत होऊन आणि कोरोना सारख्या महाभयंकर आजारामध्ये मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी केलेले कार्य पाहून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षक जितेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

---Advertisement---

यावेळी तळवेल येथील सरपंच उल्हास भारसके, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश कोळी, ग्रामपंचायत सदस्य किशोर कोळी, वरणगाव शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, उप शहरप्रमुख सुखदेव धनगर, सुनील भोई, अशोक शर्मा, राम शेटे, आबा सोनार, विभाग प्रमुख किरण माळी, प्रल्हाद माळी, हनीफ कच्छी, शाखा प्रमुख संजू कोळी, नंदू खराते, विकी मोरे, संजय खराते, इरफान शेख, सत्तार शेख, पवन माळी, भुषण माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---