---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात झोपलेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याच्या पोतसह रोकडा लंपास

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे.  शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील जोशी कॉलनीत मध्यरात्री वृध्देच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत आणि साडेबारा हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज मंगळवार ३० मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

crime

प्रकाश छबीदास भावसार (वय ६२ रा. जोशी कॉलनी, सिंधी कॉलनीजवळ जळगाव), यांची घरासमोर दुधाची डेअरी आहे. २९ मार्च रोजी घरात पत्नी व आईसह जेवण करून ते रात्री ११ वाजता झोपले. प्रकाश भावसार यांची आई इंदूबाई भावसार ह्या घराच्या वरच्या खोलीत एकट्या झोपतात.

---Advertisement---

मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असतांना अज्ञात चोरट्याने वरच्या घरात प्रवेश करून इंदूबाई यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची मंगलपोत आणि साडेबारा हजार रूपयांची रोकड असा एकुण अंदाजे ७० हजार रूपयांचा मुद्देमाला चोरून नेला. हा प्रकार आज मंगळवार ३० मार्च रोजी सकाळी उघडकीला आला.

चोरट्याने घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त केले होते. प्रकाश भावसार यांनी एमआयडीसी पोलीसात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---