जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । चोपडा शहरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकलीय. यात सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३४ तरूणींना जळगाव येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
काय आहे घटना?
चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात नगरपालिकेच्या मागील बाजूला कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार सहायक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यात ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामधील सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३४ तरूणींना जळगाव येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
या छाप्यात आढळून आलेल्या बहुतांश तरूणी या परप्रांतीय असल्याचे आढळून आले आहेत. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली