जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । गायीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिंचोली शिवारात घडली. मारहाण करणाऱ्याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली शिवारातील शेतात एक जण गायीला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. यावलचे पो नि आशित कांबळे यांना या बाबादची माहिती शुक्रवारी दुपारी मिळाली. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी पो उ नि विनोद खांडबहाले, स फौ मुजफ्फर खान, पो कॉ भूषण चव्हाण यांना रवाना केले. त्यांनी चिंचोलीचे पोलीस पाटील राकेश साठे यांना विचारपूस केली ही घटना चिंचोली शिवारातील दिवाकर भिला बडगुजर यांच्या शेतात घडल्याची माहिती मिळाली .
पोलिस पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवारात गेले त्या ठिकाणी काठेवाडी लोकांचा पाडाव होता. व्हिडिओच्या घटनेची विचारपूस केली असता यातील भरत धारा भरवाड (वय-२० , रा.पलासनेर ता. शिरपूर हल्ली मुक्काम चिंचोली शिवार ता यावल ) त्या ठिकाणी आला व सांगितले की ही गाय कोणालाही मारते व कोणाच्याही शेतात घुसून पिकांचे नुकसान करते. म्हणून ३ एप्रिल रोजी दुपारी गाईला संतापाच्या भरात काठीने मारहाण केली अशी कबुली दिली. संशयित आरोपी भरत धारा भरवाड (वय-२०) याच्या विरोधात पो कॉ सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ नरेंद्र बागुले करीत आहेत.