कृतज्ञता हाच गुरुजनांचा मोठा सन्मान – प्रकाश मुजुमदार
जळगाव लाईव्ह न्यूज | १९ सप्टेंबर २०२१ | जीवनात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो व अशा शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेने जिल्हाभरात खऱ्या अर्थाने गुरुजनांचा सन्मान करण्याचा जो उपक्रम राबवला तो कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश गंगाधर मुजुमदार यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने शिक्षकदिन कृतज्ञता कार्यक्रमांतर्गत रावेर तालुक्यातील शैक्षणिक,कला, सामाजिक,क्रीडा व अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या १२ शिक्षकांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ सुद्धा याचवेळी झाला.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित
या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून प्रकाश मुजुमदार बोलत होते. कार्यक्रमाला निंभोरा येथील डॉ.एस.डी.चौधरी,युवा
परिषदेचे जिल्हा समन्वयक गिरीश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रणित महाजन आणि निळे निशाण संघटनेचे कुणाल महाले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या शिक्षकांचा झाला सत्कार
तालुक्यातील सेवानिवृत्त पी.के. चौधरी,दिलीप वैद्य, सुधाकर झोपे,दीपक सोनार, हर्षाली बेंडाळे,सायरा बानो तबिब खान, कल्पना पाटील ,अरविंद महाजन, अरुण महाजन, शैलेश राणे, दीपक पाटील, जगदीश लोहार या ११ शिक्षकांना सन्मानपत्र आणि देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट अध्यापना बरोबरच कोरोना काळात या शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा गौरव करीत असल्याचे परिषदेच्या जिल्हा समन्वयक धनश्री विवेक ठाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे रावेर तालुकाध्यक्ष राज शकील खाटीक, उपाध्यक्ष दिपेश भुसे, सचिव भाग्यश्री बाविस्कर, कोषाध्यक्ष संकेत बोरोले,सचिव अक्षय महाजन,हर्षा सरोदे,गौरव महाजन आणि अर्शद पिंजारी यांच्यासह तालुका समन्वयक गौरव काटोळे,चेतन पाटील, पवन महाजन, प्रेम चौधरी आणि खुशी कासार यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपापल्या नियुक्तीचे प्रमाणपत्र स्विकारले. पी.के.चौधरी,दीपक सोनार, कल्पना पाटील आणि दीपक पाटील या शिक्षकांनी सत्काराला उत्तर दिले.राज खाटीक यांनी सूत्रसंचालन तसेच दीपेश भुसे यांनी आभार मानले.