जळगाव लाईव्ह न्यूज | ७ एप्रिल २०२२ आय एन एस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्याने घोटाळा करुन देशाशी गद्दारी केलेली आहे.त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्वरीत तुरुंगात टाका अशा प्रमुख मागणीसाठी मुक्ताईनगर शिवसेनेतर्फे आज ७ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रचंड निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे,सन २०१३ मध्ये आय एन एस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्यांने मोहीम सुरु केली होती.केंद्र आणि राज्य सरकारने असमर्थता दर्शविल्याने किरीट सोमय्या पुढे आले आणि प्रचंड निधी गोळा केला.रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले.आय एन एस विक्रांत देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने असंख्य लोकांनी सढळ हस्ते दान दिले.नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५-१० हजाराचं दान दिलं.यि रकमेचे काय केले हे लोकांना समजायला हवे.हि रक्कम तो भंगारात जाऊ पाहणाऱ्या युध्दनौकेचे स्मारक बनविण्याकरीता राजभवन येथे जमा करणार होता.मात्र सोमय्याने जमा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचे आरटिआय मधुन समोर आलं आहे.
लोकांच्या देशप्रेमाशी खेळुन किरीट सोमय्याने गद्दारी केली आहे.त्याच्या विरोधात देशद्राहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.किरीट सोमय्याने आय एन एस विक्रांत च्या नावाखाली रक्कम गोळा केलेल्या निधीचं काय झालं.? हा प्रश्न महत्वाचा असुन देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे.लोकांनी मोठ्या विश्वासाने विक्रांत वाचविण्यासाठी देणगी दिली.राजभवनानं आपल्याला किरीट सोमय्याकडुन कोणताच निधी मिळाला नसल्याचे सांगितले आहे.सोमय्याने जमा केलेला निधी राजभवनात जमा झालेला नाही तर मग,गेला कुठे.? हा पैसा खाल्ला कुणी.? याबाबतची उत्तरे राज्यातील जनतेला हवी आहे.आणि ती मिळालीच पाहीजेत.या घोटाळ्यात किरीट सोमय्याने अंदाजे १०० कोटी रूपयाचा घोळ करुन हे पैसे त्याच्या बांधकाम व्यवसायाकरीता तसेच निवडणुक खर्चाकरीता वापरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या देशद्रोही ला देशात रहाण्याचा अधिकार नाही तर याची जागा थेट तुरुंगात असायला हवी.याप्रकरणी किरीट सोमय्या याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला त्वरीत अटक करा अशी मागणी आंदोलक शिवसेनेतर्फे दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका प्रमुख छोटु भोई,जिल्हा अल्पसंख्याक संघटक अफसर खान,जिवराम कोळी,नवनीत पाटील,हिवराळे,गणेश टोंगे,वसंत भलभले, संतोष मराठे,पियुष मोरे,गोपाळ सोनवणे,युनूस खान, संतोष माळी,किरण कोळी,अशोक कुंभार,देवानंद वंजारी,भास्कर पाटील,योगेश चौधरी,गणेश पाटील,राजु कापसे, सुर्यकांत पाटील,सचिन पाटील,दिपक पवार,दिपक खुळे,शेख शकील,पवन सोनवणे, शिवाजी पवार,बबलु वंजारी, युवराज कोळी यांच्यासह असौख्य कार्यकर्ते उपस्थित होते.