ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे २५ रोजी आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे शनिवार दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेस अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ. कपिल पाटील, मुस्लिम ओबीसी महासंघाचे शब्बीर अन्सारी, ज्येष्ठ नेते रामहरी रूपणवार आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली.
शुक्रवार दि. १७ रोजी सहकार भवन येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, मविप्रचे चेअरमन ऍड. विजय पाटील, समता परिषदेचे ज्ञानेश्वर महाजन, वसंत पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, माजी नगरसेवक करीम सालार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी ओबोसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, मल्हार सेनेचे संजय पाटील, शिक्षक भारतीचे अजय पाटील, श्री. गायकवाड, अशोक पवार यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.