⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आ किशोर पाटील यांची पाचोरा प्रांतधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक

जळगाव लाईव्ह न्युज | २ सप्टेंबर २०२१ |अतिवृष्टी मुळे शेतीचे झालेले नुकसान पंचनामे नुकसान भरपाई अशा अनेक मुद्यावर्ती आढावा बैठक मध्ये चर्चा झाली.

या चर्चेत कृषी अधिकारी, प्रांतधिकारी व इतर अधिकारी होते. पंचनामे करायला सुरुवात करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तालुक्यात ५० घरांच तर २०० ते २२५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे समजले.

आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व माहिती दिली. परिस्तिथी पाहता लवकरात लवकर मदत यांवी हा प्रयत्न करणार आहे. रस्ते लवकर दुरुस्त करून वाहतूक पुन्हा सुरु करायची आहे यासाठी जो कोणी कॉन्ट्रॅटर काम घेईल त्याला त्याच्या कडून लेखी घेऊन बिला नंतर रॉयल्टी द्यावी ही मुभा देण्यात आली आहे.