जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका भिकुबाई बोदडे यांचा नुकताच १६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस निमित्ताने चोपडा येथे पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रीय प्लस पोलिओ मोहीम सन २०२२ अंतर्गत पोलिओ लसीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर, तहसीलदार अनिल गावित, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांचे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले, डॉ. मंजुषा भोने, नितिन लोलगे, बी. एस.सोनवणे, चंद्रकांत पाटील, नितीन महाजन, मोनाली पाटील,प्रदीप अडकमोल,राहुल सोनवणे, भारती सोनवणे, दिपमाला महाजन, दत्तात्रय पाटील, विलास पवार, प्रवीण ठाकूर आदींनी अभिनंदन केले.