---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

आम्हाला लोकसभेच्या ३ जागा लढवायच्या आहेत – रामदास आठवले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : २८मे ला रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी इथे आयोजित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आमच्या पक्षाला नागालँड मध्ये स्वबळावर लढून ८ पैकी २ जागा मिळाल्या आहेत. लोकसभेत ३ जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे.

athavle jpg webp webp

शिर्डी मधून निवडणूक लढवण्याची इच्छा असून त्यासाठी अमित शहा, फडणवीस, शिंदे, यांच्याशी चर्चा करत असून ते तिथे ते मला मदत करतील, असे रामदास आठवले नाशिक येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईत सुद्धा आम्हाला एखादी जागा दिली पाहिजे, केंद्रात संधी मिळाली पाहिजे असे आठवले म्हणाले. माझा पक्ष मजबूत

---Advertisement---

असून पुढच्या वेळी ५ आमदार असतील असे प्रयत्न सुरु असल्याचं आठवले म्हणाले. निवडणुकीत सांभाळून घ्यावं लागेल, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, सेनेची नाराजी असली तर दूर करू, असं रामदास आठवले म्हणाले. केंद्रात कॅबिनेट मिळाले तर राज्यात भाजपला फायदा होईल, असं आठवले म्हणाले.

जुनी पेन्शन योजनेची मागणी योग्य आहे. सरकारने त्याचा विचार करावा पणआर्थिक बळ पाहणे महत्त्वाचे आहे. पेन्शन लागू करावी त्यासाठी पाठिंबा असून आंदोलन थांबवले पाहिजे. नाशिक महानगरपालिकेसाठी भाजपकडे आम्ही २२ जागांची मागणी करतोय, असं रामदास आठवले म्हणाले. महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, अशी अपेक्षा आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---