⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | आमदारांच्या प्रयत्नाने शेती पंप फिडर लिंक लाईनचे काम मंजूर

आमदारांच्या प्रयत्नाने शेती पंप फिडर लिंक लाईनचे काम मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोल तालुक्यातील खडके खु.,खडकेसिम,गणेशनगर व गालापूर गांवासाठी शिवार 11Kv VSSK शेती पंप फिडर लिंक लाईन चे काम मंजुर झाले असून कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

 

आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा नियोजन विभागा अंतर्गत  मंजुर झालेल्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली असून या कामासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ आज दि ८ एप्रिल रोजी करण्यात आला. खडके खुर्द, खडकेसिम व गालापूर शिवारातील शेती पंप धारकांना आधी कासोदा उपकेंद्र येथून सप्लाय करण्यात येत होता, त्यामुळे योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास अडचण येत होती. 

 

सदर लिंक लाइन ही एरंडोल उपकेंद्र येथून टाकण्यात येत असून त्यामुळे खडके खुर्द आणि गालापूर शिवारातील शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.या कामामुळे सोनबर्डी,हनुमंतखेडे बुद्रुक, वनकोठे या गावांची देखील समस्या दूर होणार आहे. सदर काम बहु प्रतिक्षीत असल्यामुळे आमदार चिमणराव पाटील यांचे वरील सर्व गावांचे शेतकर्यांनी आभार मानले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.