⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

आनंदाची बातमी : पेट्रोल 18 तर डिझेल 11 रुपयांनी स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांनी दिले हे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । मागील काही काळापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सर्वसामान्यांना इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. गेल्या दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महागड्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. मात्र अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. Petrol Diesel Rate Today

येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते, असे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत. त्यानुसार पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 11 रुपयांनी कमी होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे नियोजन केले जात आहे.

काय आहे सरकारची योजना?
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. सध्या जीएसटी कौन्सिलमध्ये यावर चर्चा होणार आहे. यावर राज्य सरकारांकडून करार झाला तर तेलाच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. सध्या इंधनावर २८ टक्के दराने कर आकारला जातो.

फेब्रुवारी मध्ये तेजी
फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलची विक्री सुमारे 18 टक्क्यांनी वाढून 12.2 लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 10.4 लाख टन होता. हा आकडा 2021 च्या फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत 18.3 टक्के अधिक आहे.

पेट्रोलची मागणी किती वाढली?
समीक्षाधीन कालावधीत पेट्रोलची मागणी मासिक आधारावर 13.6 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये मासिक आधारावर मागणी 5.1 टक्क्यांनी कमी झाली होती. थंडीच्या मोसमात वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे ही घट झाली. देशात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन असलेल्या डिझेलची विक्री 1-15 फेब्रुवारी दरम्यान वार्षिक 25 टक्क्यांनी वाढून 3.33 दशलक्ष टन झाली आहे.