⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | वाळूमाफियांची दबंगगिरी : मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

वाळूमाफियांची दबंगगिरी : मंडळ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । अमीर पटेल । साकळी ( ता. यावल ) येथे अवैध वाळू माफिया वाहतूक करणारे ट्रक्टर पळवून नेले. याप्रकरणी गुन्हा भाग ५ गुरन १९८/२०२१ भादवी कलम 3 ७१९ , ३५३ , ४२७ , सह महाराष्ट्र जमिन महसुल सहिता कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

समिस्तर असे की, तालुक्यातील साकळी येथे आज सकाळी ७:३५ वाजेच्या सुमारास महसुल विभागाचे नायब तहसिलदार आर.डी.पाटील यांच्चा मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी शेखर तडवी, यावल तलाठी इश्वर कोळी, परसाळेच्या तलाठी समिर तडवी, उमेश बाबुरकर टाकरखेडा तलाठी, मुकेश तायडे कोरपावलीचे तलाठी, प्रविण नेहेते चुचांळे तलाठी, संदिप गोसावी कोळवद तलाठी, यांनी पथका सोबत साकळी गावात गस्त करीत असतांना मंडळ अधिकारी शेखर तडवी हे महाजन गल्लीतून गस्त करीत असताना (ट्रक्टर क्र,
लाल रंगाचे ट्रक्टर व हिरवा रंगाची ट्रॉली वाळूने भरलेले महाजन गल्ली येथे दिसले. असता शेखर तडवी यांनी ट्रक्टर ड्राइव्हरला वाळु वाहतुकीका परवाना बद्दल विचारना केली असता (ड्राइव्हर सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे ) याने आडवा आडवी चे उत्तरे दिली. तसेच खात्री झालेकी ही वाळू शासनाचे गौण खनिज साठ्यातून कुठून तरी चोरून आणली असल्याचे,

दरम्यान, आरोपी भरत गोपाळ कोळी याने ड्राइव्हर ला तु ट्रक्टर थांबवू नको, दोन्ही मंडळ अधिकारी यांच्या मोटर सायकल खाली रस्त्यावर फेकून गेला आणि आपली मोटर सायकल सोबत ट्रक्टर ड्राव्हर ने हायड्रोलिक करून खाली फेकून पळून नेले सरकारी काम करीत असतांना धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करून ट्रक्टर पळवून नेले असता मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केला. त्यानुसार तीन हजार रुपये किमतीचे सुमारे १ ब्रास आढळून आली. यांच्चा फिर्यादिवरुन रजि. गुन्हा भाग ५ गुरन १९८/२०२१ भादवी कलम 3 ७१९ , ३५३ , ४२७ , सह महाराष्ट्र जमिन महसुल सहिता कलम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल केले असून.
अधिकार असणारे मँजी सो यांच्चा कडे खबरी रिपोर्ट पाठवला असून, वरिष्ठ अधिकारीना इमेल द्वारे माहिती कळविली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.