बातम्या

अमळनेरात एकाच रात्री फोडले तीन मेडिकल दुकाने

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. अशात अज्ञात चोरट्यांनी अमळनेर शहरात एकाच रात्री तीन मेडिकल दुकान फोडून दुकानातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

या घटनेत दत्त हाउसिंग सोसायटीमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बडगुजर यांचे उत्कर्ष मेडिकलचा कडी-कोयंडा तोडून १४ हजार ५०० रुपये रोख, विजय मारुती समोरील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पाटील यांच्या हॉस्पिटलमधील जय योगेश्वर मेडिकलचा कडी-कोयंडा तोडून ३ हजार ४०० रुपये रोख तर तहसील कचेरी समोरील डॉ. किरण बडगुजर यांच्या हॉस्पिटलमधील स्वर्णिका मेडिकलचे लॉक तोडून ७ हजार ८०० रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

या घटनेत तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यात तोंड झाकलेले तीन चोरटे दुकानात शिरलेले स्पष्टपणे दिसत आहेत. याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत तिन्ही दुकानांच्या मालकांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button