---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

रेल्वे प्रवास करतांना सावधान : तुमच टिकीत तोतया टिसी तपासत नाहीये ना?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । कटनी एक्स्प्रेसमध्ये टीसी असल्याची बतावणी करून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या परप्रांतीय दोन तोतया टीसींना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरपीएफच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

tc jpg webp webp

रावेर रेल्वेस्थानकावर बुधवारी (ता.२८) तैनात आरपीएफ कर्मचारी रामब्रेश यांना एका प्रवाशाने भुसावळ- कटनी (डाउन १११२७) एक्स्प्रेसमध्ये टीसी असल्याचे भासवून जनरल डब्यातील तिकीट तपासत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच संबंधित आरपीएफने डब्याची झाडाझडती घेतली असता दोन संशयित आढळून आले.

---Advertisement---

दोन्ही संशयितांना आरपीएफने पकडून फिर्यादीसमोर हजर केले असता त्यांच्या ओळखीवरून दोन्ही संशयितांना अटक करून आरपीएफ, भुसावळ यार्ड येथे आणले.

वसौनी विकास साळुंके यांनी संशयितांची चौकशी केली असता त्याने अरविंद तिवारी (वय २६, उचेहरा, जि. सतना), शुभम पांडे (वय २०, रा.पूर्वा, ता. गर्ग, जि. रेवा) असे सांगितले. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनंतर दोघा संशयिताना भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुरुवारी (ता.२९) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---