⁠ 
सोमवार, जून 17, 2024

जळगावच्या प्रेमी युगलांसाठी पुण्याचे ‘गुलाब’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । व्हॅलंटाईन डे स्पेशल । संपूर्ण जगासह जळगावात उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेम दिन. या दिवशी आपल्या सहकाऱ्या समोर प्रेम व्यक्त केलं जातं. यासाठी वापर होतो तो गुलाबाचा. म्हणजे अशी पद्धत आहे. म्हणूनच प्रेम व्यक्त करायला गुलाबाचा वापर करतात असं म्हटलं जात. जळगावकरांच्या सेवेसाठी खास पुण्याहून ‘गुलाब’ जळगावात आणण्यात आले आहेत. (valantain day in jalgaon)

जळगाव शहरात साधारण पंधरा ते वीस अशी दुकान आहेत जिथे गुलाबाची फुलं मिळतात. जळगाव नजीक असलेल्या शिरसोली मध्ये देखील गुलाबांच्या फुलांची शेती होते. मात्र ती फुल केवळ हार बनवण्यासाठी वापरले जातात. इतर वेळेस पुण्याहून दर्जेदार फुलच प्रेम दिनी दिली जातात. एक अंदाज लावला तर पुण्याहून तब्बल १५००० फुलं जळगावत आणली गेली आहेत.(shirsavli rose )

प्रेमी युगलांसाठी व्हॅलेंटाईन डे हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या प्रियकराला व्हॅलेंटाईन डे निमित्त काही ना काही दिले जाते. हा दिवस खूप महत्त्वाच्या असल्याने प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा आधार घेतला जातो. आणि गुलाबाचा हाच आधार जळगावकरांना पुण्याहून मिळाला आहे.

पुणे तिथे काय उणे? असे म्हणतात आणि त्या पुण्याहूनच जळगावकरांसाठी खास गुलाबची फुलं मागवण्यात आली आहेत. संपूर्ण बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली असतानाच उद्याचा व्हॅलेंटाईन डे जळगावातील प्रेम युगल हे पुण्याच्या गुलाब वापरून साजरा करणार हे नक्की.

एका बाजूला लाल गुलाब फुलांची मागणी संपूर्ण जळगाव शहरात आहे. मात्र त्याचबरोबर जळगाव शहरांमध्ये पिवळ्या गुलाब फुलाची देखील मोठ्या प्रमाणावर मागणी पाहायला मिळत आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त आम्ही पुण्याहून मोठ्या प्रमाणावर फुलं मागवली आहेत. जळगावकरही आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. फुलाची एक गड्डी ज्यात वीस फुल असतात अशी साडेचारशे ते पाचशे रुपयात विकले जात आहेत.
दीपक बारी, फुल व्यवसायिक, जळगाव