जळगाव लाईव्ह न्युज | २२ एप्रिल २०२२ | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी चांगलेच खुश दिसले. जेव्हाही मी जळगाव जिल्ह्यात येतो तेव्हा मला आनंद होतो अशा शब्दात त्यांनी जिल्हा वासियांचे कौतुकही. याचबरोबर जाताजाता जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट ही देऊन गेले. मात्र आज खऱ्या अर्थानं जर सर्व लोकांचे ज्या नात्याने लक्ष वेधले ते म्हणजे रक्षा खडसे आणि नितीन गडकरी यांच्यातल्या पिता-पुत्रीच्या नात्याने.
एअरपोर्टवरून उतरल्यापासून ते पुन्हा जळगाव जिल्ह्यातून निघेपर्यंत संपूर्ण काळ नितीन गडकरी आणि रक्षा खडसे यांच्यात काही न काही बोलणं सुरू होते. हे बोलणे म्हणजे एका बाप लेकीच्या संवाद याप्रमाणे वाटत होते. शिवतीर्थावर भाषण करताना रक्षा खडसे म्हणाल्याही नितीन गडकरी हे माझ्या वडिलांप्रमाणे आहेत त्यांच्याकडे मी जे काही मागते ते सर्व ते मला करून देतात.
माझ्या माहेरी जायचा रस्ता देखील त्यांनी करून दिला आहे. येत्या काळात मी माहेरी बोटीने जाईल असेही त्या म्हणाल्या. याच बरोबर इतर कोणीही मंत्री म्हणा, आमदार म्हणा, किंवा खासदार ज्यांनी कोणी मागण्या केल्या त्या मागण्या नितीन गडकरी हे रक्षा खडसे यांना हक्काने लिहून ठेवायला सांगत होते यामुळे या दोघांना म्हटलं बापलेकीचा नातं लोकांपुढे आज आलं