---Advertisement---
बातम्या

चाकू हल्याने हादरले जळगाव शहर, वाचा संपूर्ण बातमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । जुना वाद उफाळून आल्यानंतर भावाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या तरुणावरही आरोपींनी चाकूहल्ला करीत मारहाण केल्याची घटना शहरातील हरीविठ्ठल नगरातील बाजारपट्टा भागात शनिवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2 jpg webp webp

दोघांविरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा
सादिक चांद देशमुख (17, हरी विठ्ठल नगर, जळगाव) यांच्या भावाशी संशयीत आरोपी सुरीं (पूर्ण नाव नाही) व भावेश (पूर्ण नाव नाही, दोन्ही रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांचा शनिवारी जुन्याच कारणावरून दुपारी दोन वाजता वाद सुरू होता. सादिक देशमुख हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर भावेशने हातातील चाकूने उजव्या हाताच्या खांद्यावर मारल्याने गंभीर दुखापत झाली तर सुरजने हातातील प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करून दोघा भावांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या सादिकला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सादिक चांद देशमुख यांच्या फिर्यादीवरून सुरज आणि भावेश (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---