⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

गिरीश महाजनांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही : सत्ता परिवर्तन यांनी केलेले नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. त्यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही असे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.

यावेळी ते म्हणाले कि, गिरीश महाजनांच विधान चुकीच आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती.. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो..

राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, असेही गायकवाड म्हणाले.


शिवसेना फोडणे हे भाजपचं मिशन होतं, अशी कबूली भाजप नेते गिरीश महाजन यांनी नुकतीच पाचोऱ्यात दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, आधी आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ सैन्य बाहेर पडले.