---Advertisement---
जळगाव जिल्हा

अख्या जळगाव शहराच पाणी वास मारताय आणि मनपा म्हणतेय ..

---Advertisement---

manapa nal jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ जून २०२२ | जळगाव शहराला विविध समस्यांनी वेढलेले असतानाच यात अजून एक समस्या वाढली आहे. ती म्हणजे संपूर्ण जळगाव शहरात कुजटवास येणारे पाणी जळगाव शहरातील नागरिकांना मिळत आहे. जळगाव शहरातील नागरिक आधीच इतर सर्व समस्यांनी ग्रस्त आहेत. जळगाव शहरातल्या नागरिकांना रस्ते नाही. फिरायला जायला जागा नाही. महानगरपालिका त्यांच्यासाठी हवं ते करू शकत नाहीये. मात्र जळगाव शहरातील नागरिकांना आता साधं पाणीही पिणं मुश्किल झाल आहे. कारण त्यांच्या नळातून येणाऱ्या पाण्याला कुजट वास येत असल्याच्या असंख्य तक्रारी जळगाव शहर महानगर पालिकेकडे केल्यानंतरही मनपाकडून कोणतीही कारवाही किंबहुना उपायोजना करण्यात येत नाहीये.

---Advertisement---

विशेष म्हणजे महानगरपालिके कडून देण्यात आलेले उत्तर हे देखील तितकेच हास्यास्पद आहे. महानगरपालिकेच्या पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण वाढल्याने असा वास येत आहे. असे मनपाचे म्हणने आहे. मात्र क्लोरीनचा वास हा जळगाव शहरातील नागरिकांना कसा असतो हे माहिती आहे पाण्याला येत असणारा वास आणि क्लोरीन ला येत असणारा फरकही नागरिक जाणतात. यामुळे याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा शाखेची बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरामध्ये पाणी समस्या भीषण झाली आहे. पाणी मुबलक प्रमाणात जरी असलं तरीदेखील पाण्याचा रंग बदलला आहे. हे पाणी तुम्ही पिऊ शकता असं महानगरपालिकेने सांगितले. मात्र दुसरीकडे आता त्यास पाण्याला कुजट वास येत असल्याने जळगाव शहरातील नागरिक आता महानगरपालिकेचे करायचं तरी काय? असा प्रश्न विचारत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---