⁠ 
सोमवार, मे 6, 2024

International Tea Day : ‘चहा’बद्दल तुम्हाला वाचायला आवडतील अशी २५ रोचक तथ्ये

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । ‘चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच’ जगभरात चहाचे शौकीन सापडणार नाही असे होऊच शकत नाही. बहुतांश नागरिकांची दिवसाची सुरुवात चहानेच होते. आज आहे २१ मे ‘जागतिक चहा दिवस’. भारतात दिवसभरात मोठ्याप्रमाणात चहा रिचवला जातो परंतु चहाची सुरुवात नेमकी कुठून झाली?, चहा पिण्याचे फायदे-तोटे काय? अशी २५ रोचक तथ्ये आज आम्ही आपल्यापर्यंत मांडणार आहोत.

1. चीनमधील लोकांनी सर्वप्रथम चहा पिण्यास सुरुवात केली.
2. असे म्हटले जाते जी, चीनच्या शान नुंग या राजासमोर गरम पाण्याचा कप ठेवला असता त्यात चुकून चहाची सुकलेली पाने पडली आणि त्या पाण्याचा रंग बदलला. जेव्हा राजाने हे पेय प्यायले तेव्हा त्याला ही नवीन चव खूप आवडली आणि तेव्हापासून चहा पिण्यास सुरुवात झाली.
3. जगभरात पाण्यानंतर सर्वाधीक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा होय.
4. जगभरात सुरुवातीला चहा फक्त हिवाळ्यात औषध म्हणून घेतला जात होता. असे म्हणतात इंग्रज भारतात आल्यावर चहा रोज पिण्याची परंपरा भारतातच सुरू झाली.
5. भारतात 1835 पासून चहा पिण्यास सुरुवात झाली.

6. जगभरात चहाचे 1,500 पेक्षा जास्त प्रकार आहेत, त्यापैकी काळा, हिरवा, पांढरा आणि पिवळा चहा खूप लोकप्रिय आहे.
७. चहाची पाने काही वेळ पाण्यात भिजवून त्याचा वास घरात पसरवला तर ते नैसर्गिक ‘ऑलआउट’ म्हणून काम करते आणि डासांना दूर करते.
8. चहा हे अफगाणिस्तान आणि इराणचे राष्ट्रीय पेय आहे.
9. इंग्लंडमधील लोक दररोज 160 दशलक्ष कप चहा पितात. यानुसार एका वर्षात 60 अब्ज कप चहाचा वापर होतो.
10. जगभरात होणाऱ्या चहाच्या वापरापैकी 75% काळ्या चहाचा वापर होतो.

हे देखील वाचा : गोर्‍या इंग्रजांनी संपूर्ण भारताला लावली चीनच्या चहाची सवय; वाचा काय आहे इतिहास

11. भारतात प्रामुख्याने आसाममध्ये चहाचे उत्पादन होते आणि चहा हे आसामचे राष्ट्रीय पेय देखील आहे.
12. चहा उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
13. भारतात काळ्या चहाचा सर्वाधिक वापर केला जातो. जगभरातील एकूण चहापैकी ३० टक्के चहा भारतीय लोक पितात.
14. यूएसमध्ये, 80 टक्के चहा ‘आईस टी’च्या स्वरूपात वापरला जातो.
15. प्रत्येक तुर्की व्यक्ती दररोज 10 कप चहा पितात.

16. चहामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे तुम्हाला वृद्धत्वापासून वाचवतात.
17. रिकाम्या पोटी काळा चहा प्यायल्याने पोट फुगते आणि ऍसिडिटी व अपचन होऊ शकते.
18. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमच्या भूकेवर परिणाम होतो किंवा भूक लागणे थांबते. जेव्हा हे असे घडते तेव्हा तुम्हाला आवश्यक पोषणापासून वंचित राहावे लागू शकते.
19. चहा जर जास्त प्रमाणात उकळला तर तो शरीरासाठी जास्त हानिकारक होतो.
20. जास्त कडक चहा प्यायल्याने अल्सरचा धोका वाढतो.

21. दिवसातून 4-5 कप चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो.
22. ऑस्ट्रेलियात झालेल्या एका संशोधनानुसार चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. चहामधील कॅटेचिन्स नवीन हाडे तयार करण्यास मदत करतात.
23. जगात आज लोकप्रिय असलेल्या टी बॅग्सचा शोध चुकून लागला होता.
24. थॉमस सुलिव्हन या अमेरिकेतील व्यावसायिकाने चहाचे नमुने सिल्कच्या पिशव्यांमध्ये टाकून ग्राहकांना पाठवले. ग्राहकाने चुकून संपूर्ण रेशमी पिशवी गरम पाण्यात टाकली. त्याच्या चुकीचा फायदा सुलिवानला मिळू लागल्यावर त्याने चहा पिशव्यांमध्ये टाकून विकायला सुरुवात केली.
25. चहामध्ये ‘L-theanine’ नावाचा घटक असतो, जो तुमची मेंदूची शक्ती वाढवण्यास, तणाव कमी करण्यास, बुद्धीचा विकास करण्यास मदत करतो. आणि थोडा वेळ झोपू देत नाही.