जळगाव जिल्हामहाराष्ट्र

मोठी बातमी : झेडपी भरतीबाबत गिरीश महाजनांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांची विद्यार्थ्यासोबत झालेले संभाषणाचे एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाले आहे. या क्लिपमध्ये महाजन हे विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलताना दिसत आहेत. यामुळे आता महाजनांची मोठी अडचण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

एका तरुणानं नोकरी भरती विषयी मंत्री गिरीश महाजनांना फोन केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. महाजन यांना फोन लावून तरुणाने म्हंटले की, “साहेब झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे. तेवढं बघा ना सर. मुलं खूप डिप्रेशन आहेत.”यावर महाजन म्हणाले, तुम्हाला कामं नाहीत का रे काही. दिवसभरातून ५०० फोन करता. मी काही ते करत नाही. रद्द केली मी ते. “यानंतर विद्यार्थ्याने म्हंटले की, “अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहे.” तर यावरही महाजन म्हणाले की, रद्द केले ते, ठेव फोन.

फोनवर संभाषण होत असताना महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. यामुळे आता महाजन यांच्यावर टीका होत आहे. यावर महाजन यांची प्रतिक्रीया अजूनही आलेली नाही. मात्र त्यांच्यावर विविध स्तरातून रोष व्यक्त होत आहे.

दरम्यान, ऑडियो क्लिपमध्ये संबंधित व्यक्ती विद्यार्थांना जिल्हा परिषद आरोग्य भरती रद्द केल्याचं सांगत आहे. जी परीक्षेचं काम न्यासाकडे होतं. परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यानंतर परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र, नंतर परीक्षा कधी याचं स्पष्टीकरण मिळत नसल्याने परीक्षार्थी अस्वस्थ आहेत.

शिवाय पैसे आणि फॉर्म भरून वर्ष होत आलं तरी परीक्षा झालेली नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना फोन केल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडियो क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाहीये.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button