---Advertisement---
आरोग्य कोरोना

टेंशन पुन्हा वाढले ! चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । जगावरील कोरोना व्हायरसचे सावट अद्यापही दूर झालेलं नाहीय. अशातच आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणू आढळून आल्याने जगाचे पुन्हा टेन्शन वाढले आहे. चीनमध्ये आता झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) नावाचा व्हायरस सापडला असून 35 जणांना त्याची लागण झाली आहे. यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

virus jpg webp

तायवानच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आलेल्या माहितीनुसार, या व्हायरसमुळे आतापर्यंत ३५ लोकांना संक्रमित केलं आहे. हा आजाराविषयी आणखी माहिती घेण्याचं काम सुरू असून संसर्ग ओळखण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धत सुरू करेल.

---Advertisement---

तायवानच्या सीडीसीचे उपमहानिदेशक चुआंग जेन-हिसियांना यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार माणसांमध्ये फैलावत असल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत यावर वैज्ञानिक तपास सुरू आहे, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, स्वच्छता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.पाळीव प्राण्यांवर केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची माहिती देताना त्यांनी सांगितलं की, दोन टक्के शेळ्या आणि पाच टक्के कुत्र्यांना या विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे तुमच्याकडेही पाळीव प्राणी असतील तर सावधान राहण्याची गरज आहे.

Zoonotic Langya virus ची लक्षणं काय?
या विषाणूचा संसर्ग असणाऱ्यांमध्ये ताप, मळमळ, सर्दी- पडसं, भूक कमी होणं, सांधेदुखी, डोकेदुखी आणि उलट्या अशा लक्षणांची नोंद करण्यात आली आहे. शरीरात पांढऱ्या पेशींची कमतरता होत असल्याची बाबही अशा रुग्णांतून समोर आली आहे. यकृत निकामी होणं, मुत्राशय निकामी होणं, अशी परिस्थितीही यामध्ये उदभवत असल्याचं निरिक्षणास आलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---