सुप्रिम कॉलनीतून मध्यरात्री तरूणाचा मोबाईल लांबविला

मार्च 22, 2021 3:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या तरूणाचा १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल २१ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप भादा करोचे (वय 20) रा. धामणी मध्यप्रदेश, ह.मु. पालीस कॉलनी वसाहत, सुप्रिम कॉलनी येथे राहतो. गेल्या सहा महिन्यांपासून कामाच्या निमित्ताने जळगावात राहत आहे. उन्हाळ्याचा उकाडा जाणवत असल्याने 21 मार्च रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपला होता.

Advertisements

उघडा दरवाजा आणि अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 14 हजार रुपये किंमतीचा रेडमी मोबाईल हँडसेट चोरून नेला. सकाळी उठल्यावर हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी प्रदीप करोचे  यांने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांनी विरोधात तक्रार दिली. तरुणाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now