⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर… तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर… तरुणाची अल्पवयीन मुलीला धमकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । चोपडा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ती म्हणजे तरुणाने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवण्याची व बदनामी करण्याची धमकी दिलीय. इतकंच नव्हे तर त्याने माझ्यासोबत लग्न केलं नाहीतर महिनाभरापूर्वी जसा एका मुलीचा खून झाला होता तसा तुझा खून करेन, अशी धमकी अल्पवयीन मुलीला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गंभीर दखल घेत तिला त्रास देणाऱ्या रोमियोला अटक केली आहे. सागर दगडू पाटील (रा.चोपडा) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
चोपडा शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती महाविदयालयात जात असतांना सागर पाटील या तरुणाने मुलगी अल्पवयीन असतानाही प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. तसेच सागर पाटील हा वेळोवेळी तिचा पाठलाग करायचा तसेच पिडीत मुलीच्या मोबाईल क्रमांकवर वेळोवेळी संपर्क साधायचा. पिडीत मुलीची ईच्छा नसतांना देखील सागर याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. परंतू त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला.

याचा राग आल्याने सागर याने दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीतेस महाविद्यालयात प्रत्यक्ष भेटून तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही. तर एक ते दिड महिन्यापूर्वी एका मुलीचा जसा खून झाला होता तसा तुझा खून करेन. तसंच तूझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

इतकंच नव्हे तर तरुणीने तुझा मर्डर करुन तुझी बदनामी करुन टाकेन अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर माझ्यावर प्रेम करावे व लग्न देखील करावे लागेल, असे बोलून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे गैरकृत्य करुन मुलीला चापटांनी मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने मंगळवारी चोपडा शहर पोलिसात सागर पाटील याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे हे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.