---Advertisement---
गुन्हे भुसावळ

तरुणाची बसवर दगडफेक, बालिका जखमी ; वरणगाव जवळील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळील सातमोरी पुलाजवळ मेहकर-भुसावळ या बसवर एका तरुणाने दगडफेक केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या दगडफेकीत बसमधील पाच वर्षीय बालिका देवांशी स्वप्नील सुलताने (वय ५, रा. गुंजखेडा ता.लोणार जि.बुलढाणा) ही जखमी झाली. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित तरूणाला अटक करण्यात आली आहे.

news1 jpg webp

नेमका प्रकार काय?
मेहकर – भुसावळ बस क्रमांक (एमएच ४० एन ९९४१) हि बस मेहकरवरून भुसावळला जात असतांना शनीवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विशाल संजय बोंडे हा महामार्ग क्रंमाक सहावरील हॉटेल आमत्रंणच्या दुचाकी क्रमांक (एमएच१९ डीआर ५०४३) वर मोबाईलचे हेड फोन लावुन बसच्या पुढे आला व दुचाकी आडवी लावुन शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याला बसमधील काही प्रवाशांनी समजवण्यासाठी गेले असता त्याने दगडफेक सुरु केली.

---Advertisement---

यात बालिका देवांशी स्वप्नील सुलताने बालीकेच्या डोक्यावर दगड लागल्याने ती गंभीर जखमी झाली तर वाहक पिंगळे यांना मारहाण केली. या प्रकरणी बस चालक योगेश यशवंत सांवळे वय ३९ धंदा चालक भुसावळ डेपो रा. खेडी बुद्रूक ता.भुसावळ यांच्या फिर्यादीवरून विशाल बोंडे याचेविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित तरूणाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार नागेंद्र तायडे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---