धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून भडगावच्या तरुणाचा परराज्यातील महिलेवर अत्याचार, पिडीत महिला गर्भवती

जानेवारी 22, 2023 4:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ जानेवारी २०२३ | महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण वाढतच असून अशातच फेसबुकवरून ओळखी निर्माण करत लग्नाचे आमिष दाखवत परराज्यातील महिलेवर अत्याचार केला. इतकचं नव्हे तर या अत्याचारात महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

नेमकी काय आहे घटना?
भडगाव शहरातील सागर भिमा वैद्य याने गुजरात राज्यातील एका २६ वर्षीय महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले. यानंतर सागर वैद्य याने महिलेला नाशिक येथे बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. एवढेच नाही तर महिलेसोबत काढलेले फोटो मित्रांना पाठविले.

Advertisements

या अत्याचारात महिला गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, महिला गरोदर असल्याचे समजताचा संशयित आरोपी सागर भिमा वैद्य हा पळून गेला. महिलेने अखेर भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून सागर विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे..

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now