भरधाव ट्रकने युवकाला चिरडले ; रावेरमधील घटना

सप्टेंबर 6, 2023 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात आणखी एका भीषण अपघातात तरुणाला जीव गमवावा लागलाय. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील युवकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडलीय. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय-२५, रा. अहिरवाडी ता. रावेर) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ahirwadi young kils jpg webp webp

मनोहर उर्फ मनोज कडू वाघ हा रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून, हातमजूरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. ५ सप्टेंबर रोजी सकाळी तो दुचाकीने नेरुळ येथे कामावर जात असतांना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.

Advertisements

अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केल. मनोहरच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार असून त्याची पत्नी गरोदर असल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now