---Advertisement---
जामनेर गुन्हे

जळगाव जिल्हा पुन्हा हादरला ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येतंय. मागील चार दिवसात दोन तरुणांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच त्यातच आणखी एका खुनाची घटना समोर आलीय. पहूर – जामनेर मार्गावरील सोनाळा शिव रस्त्यावर शिंगाईतच्या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. प्रमोद उर्फ बाळू वाघ (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव असून गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे पहूरसह सोनाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

pahur murder jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
पहूर -जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावननजीक सोनाळा -पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद वाघ याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होता. दुपारी जामनेरहून पहूर येथे जातो, असे शालक (रा. पाटखेडा) यास फोनवरून सांगितले. शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह ३ ग्लास, पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला. बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

---Advertisement---

मारेकऱ्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती. प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले. शेतकऱ्याने तत्काळ पहूर पोलिसांची संपर्क केला. पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत प्रमोद वाघ याच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---