---Advertisement---
जळगाव शहर

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । राज्यात एकीकडे राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या गढूळ झालेले असताना जळगावात मात्र युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रोज इफ्तार पार्टीद्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला. रमजान महिन्यानिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सुरु असलेल्या जातीयवादाकडे लक्ष न देता सर्वांनी आपसात समन्वय ठेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

roza iftar

नेहरू युवा केंद्र जळगाव संलग्नित युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रमजान महिन्यानिमित्त रविवारी शनिपेठेत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, माजी उपमहापौर करीम सालार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, डॉ.विवेक जोशी, नदीम मलीक, काँग्रेसचे अमजद पठाण, आदी उपस्थित होते.

---Advertisement---

राज्यासह जिल्ह्यात सध्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना वाढत आहे. सोशल मीडियात भडकावू आणि अफवा पसरविणारे मेसेज पाठविले जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला आणि सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते असे मान्यवरांनी सांगितले.

सायंकाळी ६.४५ वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोहार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल अमीर शेख, प्रास्ताविक चेतन वाणी तर आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी इम्रान खान, अजहर खान, जकी अहमद, जावेद शेख, यासीर खान, फिरोज शेख, शाहरुख खान, तौसिफ़ खान, शाहिद खान, नझर खान, समीर खान, रेहान अली, इरफान सालार, आरिफ शेख, इसरार खान, फहीम खान, सोहेल खान, कमलेश देवरे, कृणाल महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---