---Advertisement---
गुन्हे जामनेर

Jamner : बेलाची पाने तोडताना बहिणीला लागला शॉक, भाऊ वाचवायला गेला अन् घडलं विपरीत..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । जामनेर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय. बहिणीला खाली पडलेल्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने शोक लागला. हे भावाच्या लक्ष्यात येताच ती तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्याचाच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. समाधान आनंदा मोरे (वय ३४) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

pahur jpg webp webp

पहुर पेठच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आनंदा सांडू मोरे यांचा लहान मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) आणि त्याची बहीण आशाबाई मोरे, चुलत बहिण सारिका मोरे, शैलाबाई घोडेस्वार हे नेहमीप्रमाणे बेलाची पान तोडण्यासाठी गेले होते.

---Advertisement---

या दरम्यान, तुटलेल्या वीजेच्या तारेवर आशाबाई मोरे यांचा पाय पडला. हे पाहुन आशाबाई यांना वाचवण्यासाठी समाधान मोरे यांने हातात हा तार पकडला. त्याचवेळी विजेच्या जबर धक्क्याने समाधान मोरे याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

या घटनेनंतर समाधान मोरे याला पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. समाधान मोरे याचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत समाधान मोरे यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत पहुर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---