पाचोऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई; 20 तलवारीसह तरुणाला अटक

सप्टेंबर 19, 2025 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आला घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. याच दरम्यान पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या 20 तलवारी जप्त एका तरुणाला अटक करण्यात आली. सोहेल शेख तब्युब शेख (वय 24, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून या कारवाईत सुमारे 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

talavari japt

पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात काही तलवारी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. त्या माहितीनुसार माहिजी नाका परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सोहेल शेख तब्युब शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 18 तलवारी जप्त करण्यात आल्या तर कारवाईपूर्वी विक्री केलेल्या 2 तलवारीही पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केल्या आहेत.

Advertisements

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६०/२०२५ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now