जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून यातच रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढली जात असल्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. असाच एक प्रकार जळगाव तालुक्यात घडला. वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीचा पाठलाग करत तिला इशारे करून छेडखानी काढल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात शासकीय रुग्णालयात सदर तरुणी हि वैद्यकीय अधिकारी आहे. तरुणी नोकरीला असलेल्या रुग्णालयात जाऊन तसेच रस्त्याने येता- जाताना तिचा सातत्याने पाठलाग करत त्रास दिला जात होता. या तरुणाने तरुणीला तिचा फोन नंबर मागितला. तसेच तू माझ्याशी फोनवर बोल असे म्हणत तिची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
अखेर पोलिसात गुन्हा दाखल
रोज होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसात धाव घेतली. छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली असून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रस्त्याने येताना जाताना सुद्धा वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीचा पाठलाग करत तरुणाने तिची छेड काढली. त्याचप्रमाणे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रयत्न केले असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.