---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

युवकांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतले विष

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येतील युवतीने तीन तरुणांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

खेरडे (सोनगाव) येथे काही दिवसापासून तीन मुल मुलीच्या घरासमोर येऊन अश्‍लील चाळे करून शारीरिक व मानसिक छळवणूक करत होते. रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  या तिघांनी सदर मुलीच्या घरासमोर उभे राहून हातवारे करत इशारा केला. तरुणांच्या या त्रासाला कंटाळून सदर युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

---Advertisement---

विशाल एकनाथ जाधव, विलास पुरणदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण (सर्व रा. खेरडे सोनगाव) असे या तरुणांचे नावे असून त्यांच्या विरोधात गोरख चना राठोड (वय-४९) रा. खेरडे (सोनगाव) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५ नुसार आज दुपारी वरील आरोपी तीघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी या तिन्ही तरूणांचा शोध सुरू केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---